रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता.

रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)

डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपबासमती तांदूळ
  2. 1/4 कपतुरडाळ
  3. 1/4 कपमुगडाळ
  4. 1कांदा बारीक चिरून
  5. 1टोमॅटो बारीक चिरून
  6. 5-6लसूण पाकळ्या बारीक चिरून
  7. 1 तुकडाआद्रक बारीक चिरून
  8. थोडासाकडीपत्ता
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1हिरवी मिरची उभी चिरलेली
  12. 1 टीस्पूनधणेपूड
  13. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तुरडाळ, मुगडाळ स्वच्छ धुवून हळद,मीठ पाणी घालून शिजवून घ्यावे.

  2. 2

    तांदूळ ही स्वच्छ धुवून मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, कडीपत्ता, आद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या. कांदा घालून छान परतून घ्या.टोमॅटो घालून परतावे.

  4. 4

    धणे जीरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर शिजवलेली डाळ घालावी.

  5. 5

    नंतर पाणी घालून मिक्स करा. (खिचडी किती पातळ किंवा घट्ट हवी त्या नुसार पाणी घालवी) तयार भात घालून मिक्स करावे. (भात आणि डाळी मध्ये मीठ घातले आहे त्यामुळे गरज आसेल तर थोडे मीठ घालावे.)

  6. 6

    दहा मिनिटे खिचडी शिजवून घ्यावी.

  7. 7

    गरमागरम खिचडी वरतून तुप घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes