शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)

"शाही मसाले दूध"
कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!
कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते.
शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो.
म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बदाम काजू पिस्ता जायफळ आणि वेळची पूड मिक्सर मध्ये घालून घ्या
- 2
त्याचे कोर्स मिश्रण करून घ्या
(आपले मसाले दूध मिक्स तयार आहे) - 3
दूध उकळवून घ्या, त्यात केसर, चारोळी घालून 2 -3 मिनिट उकळवून घ्या
- 4
आता 2 टेबलस्पून साखर घालून साखर वितळली की त्यात 2 टेबलस्पून तयार मसाले दूध मिक्स घालून घ्या,आणि अजून 2 मिनटं दूध उकळवून घ्या
- 5
बस आपले "शाही मसाले दूध" पिण्यास तयार आहे....👌👌
- 6
आजच्या कोजागिरीला नक्की याचा आनंद घ्या....👍👍👌👌
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या