लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)

#CDY
बालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..
ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...
चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....
चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बेसन चाळणीने चाळून घ्यावे. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ओवा, जीरे, मिरे यांचा बारीक मसाला पावडर तयार करून घ्यावा. व बारीक चाळणीने चाळून घ्यावा.
- 2
चाळून घेतलेला बेसना मध्ये चवीनुसार तिखट-मीठ, तयार केलेली मसाला पावडर, किंचीत हळद (ऑप्शनल) व कडकडीत गरम केलेले तेल घालून बेसन हाताने चोळून चोळून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यावी व त्यातच थोडे पाणी घालून चाळणीने हे पाणी गाळून घ्यावे. व हे पाणी चोळून घेतलेल्या बेसनामध्ये घालावे. चांगले मिक्स करावे. नंतर आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा गोळा करून घ्यावा.
- 4
मळलेल्या गोळ्याचे लंब गोलाकार गोळा करून शेव पाडणाऱ्या साच्यात भरून घ्यावे व गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती हे शेव दोन्ही बाजूने तळून घ्यावेत.
- 5
तयार आहे आपले चटपटीत, कुरकुरीत खमंग *लसुणी शेव*.. 💃 💕
- 6
- 7
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या