मारी बिस्कीट पॉट केक (marie biscuit pot cake recipe in marathi)

मारी बिस्कीट पॉट केक (marie biscuit pot cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दिड कप पाण्यामध्ये कॉफी पावडर आणि साखर घालून ब्लॅक कॉफी तयार करून घ्यावी...
- 2
व्हिपिंग क्रीम बिटर च्या सहाय्याने स्टीफ पिक येईपर्यंत बीट करून घ्यावे... माझ्या कडील व्हिपिंग क्रीम मध्ये साखर आधीच घातलेले होती... पॅकेट वरील इन्स्ट्रक्शन चेक करून त्यानुसार वापरावे... आवडत असेल तर खाण्याचा रंग घालावा... हे पूर्णपणे ऑप्शनल आहे...
- 3
कॉफी वापरण्यापूर्वी कोमट झालेली असावी... ती खूप गरम असू नये नाहीतर बिस्किट वितळून जाईल आणि थंड ही असू नये नाहीतर बिस्किट कॉफी सोक करणार नाही...
- 4
वीप केलेलं क्रीम पायपिंग बॅग मध्ये भरून घ्या... वाटीच्या तळाला थोडं क्रीम घाला, मग त्यावर कॉफीमध्ये बुडवून मारी बिस्कीट ठेवा... पुन्हा त्यावर क्रीम घाला आणि पुढील मारी बिस्कीट ठेवा... अशाप्रकारे एका वाटीमध्ये पाच मारी बिस्किटे घाला... नंतर क्रीम च्या सहाय्याने आजूबाजूची रिकामी जागा भरून घ्या आणि लेव्हल कडून घ्या... नंतर आणखीन एक बिस्कीट कॉफीमध्ये बुडवून वर ठेवा... क्रीम च्या सहाय्याने आवडत असेल तर डिझाईन करून घ्या... नंतर त्यावर आवडीनुसार चॉकलेट किसून घालावे...
- 5
सजावटी करिता वरून चेरी किंवा कोणत्याही आवडत्या फळाचा तुकडा ठेवावा... ही वाटी किमान दोन ते तीन तास फ्रिजमध्ये थंड करून घ्यावी... आपला मारी बिस्कीट पॉट केक खाण्यासाठी तयार आहे...
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या (2)