गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

थंडीचा सिझन आला की वेध लागतात ते बाजारात गाजर आलेत का ? जेव्हा गाजराचे लालेलाल मोठमोठे ढीग दिसू लागले की मनात गाजर हलव्याचे बेत आखले जातात. तर अशी आहे माझी गाजर हलव्याची गंमत. ही माझी शंभरावी रेसिपी आहे म्हणून आणि थंडीचा सिझन आहे म्हणून गाजर हलवा तर झालाच पाहिजे.चला तर मग पाहूया हा त्याची रेसिपी

कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर गाजर स्वच्छ धुऊन त्याचे
पिलर ने साल काढून घेणेआणि बाकीचे साहित्य जमवून घेणे. - 2
आता मीडियम साईज चे किसणीवर गाजर किसून घेणे. कढईमध्ये किसलेले गाजर घेऊन थोडे परतून घेणे आता त्यात केशर,गरम केलेले दूध घालने आणि गाजर मंद गॅसवर झाकण ठेवून शिजू देणे.
- 3
आता जेव्हा दूध पूर्ण आटते आणि गाजर छान शिजते त्या वेळेस त्यात साखर घालने. सुकामेवा घालने. साखर विरघळून हलवा घट्ट होत आला की त्यात तूप घालून हलवा छान परतून घेणे.
- 4
तयार आहे आपला गाजर हलवा. जा गरम किंव्हा थंड कसाही छान लागतो
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)