अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बोल मध्ये अंडी, साखर, आणि तेल घेऊन बिटरने सर्व साहित्य फेटून घ्या.
- 2
नंतर बोल वर एक चाळणी ठेवून त्यामध्ये मैदा, बेकिंग सोडा,बेकिंग पावडर आणि कोको पावडर चाळून घ्या.व्हॅनिला इसेन्स ॲड करा. आणि मिश्रण हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवत मिक्स करून घ्या. लागेल तसे थोडे थोडे दूध ऍड करा. सैलसर मिश्रण तयार करून घ्या.
- 3
केकच्या टिनला बटर पेपर किंवा तेल व मैदा लावून ग्रीस करून घ्या. तयार केकचे मिश्रण टिन मध्ये ओता.टिन ला 4 ते 5 वेळा टॅप करून घ्या.
- 4
गॅसवर कढई किंवा टोप पाच मिनिटांसाठी झाकण लावून प्रीहीट करून घ्या. कढई प्रीहिट झाली की कढईच्या बुडाला एक जाळी ठेवून त्यामध्ये केकचा टीन ठेवा. आणि मंद आचेवर केकला तीस ते पस्तीस मिनिटे शिजू द्या.
- 5
केक शिजला आहे कि नाही ते सुरीच्या साह्याने चेक करा. केक पूर्णपणे थंड झाला की तो टिनमधून बाहेर काढून घ्या.केक वर वरतून चॉकलेट सिरप घाला. चॉकलेट किसून घाला. आवडीनुसार केकची सजावट करून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या