हॉटेल स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)

हॉटेल स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कूकरच्या डब्यात भिजलेली डाळ मिरची,हळद,हिंग घालून कूकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्याव्यात आणि डाळ शिजवून घ्यावी.
- 2
आता डाळ शिजल्यावर गॅसवर कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये मोहरी घालून तडतडू द्यावी मग जीरे घालून मिरची,तेजपत्ता घालून त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा घालून तो मऊ होऊ द्यावा.
- 3
कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो चिरलेला घालून अद्रक,लसूण,मिरची पेस्ट घालून घ्यावी. मग हळद,बेडगी मिरची पावडर, किचन किंग मसाला घालून परतून घ्यावे. हे सर्व साहित्य परतून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे शिजू द्यावे
- 4
आता पाच मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये शिजलेली डाळ घालून त्यामध्ये कसूरी मेथी,मीठ घालून डाळ पाच ते सहा मिनिटे शिजू द्यावी, डाळ शिजल्यावर शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावे.
- 5
दाल फ्राय तयार आहे ही दाल फ्राय गरम गरम जिरा राईस बरोबर सर्व्ह करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (2)