टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो, कांदे, बटाटे बारीक चिरून घ्यावे. तांदूळ धुवून ठेवावे.
- 2
सोललेली लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सर मधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
- 3
कुकर मध्ये तेल घालून त्यात फोडणीसाठी जीरे, हिंग घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतावा. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगला मऊ होईपर्यंत परतून त्यात खोबर्याचे वाटण घालून परतावे मग तिखट पूड, हळद, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे.
- 4
मसाला चांगला परतून त्यात बारीक चिरलेला बटाटा आणि वाटाणे घालून, धुतलेले तांदूळ घालून जरा अलगद परतावे. मग तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मग दोन टीस्पून तूप घालून नंतर कुकर बंद करून दोन शिट्या काढून टोमॅटो राईस शिजवून घ्यावा.
- 5
गरमागरम सोनेरी रंगाच्या टोमॅटो राईस बरोबर पापड सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013122












टिप्पण्या