एग फ्राईड राइस (Egg fried rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दोन अंडी फेटून त्यात मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून त्याचे ऑमलेट करून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे लहान तुकडे कापून घ्यावे.
- 2
मोठ्या कढई मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण व आल
मोठ्या आचेवर परतून घ्यावे. - 3
नंतर त्यात क्रमाने पातीचा कांदा (पांढरा) परतावा.नंतर त्यात पातीचा कांदा (हिरवा),गाजर,फरसबी,कोबी परतावे.आवडत असेल तर चिमुटभर मिरी पावडर किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून घालावी.सोया सॉस व चवीनुसार मीठ घालून परतावे.
- 4
शेवटी त्यात भात व तुकडे केलेले ऑमलेट घालून मिक्स करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16052582




टिप्पण्या