भडंग (Bhadang recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढई मधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात मोहरी, जीरे, हिंग, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडिपत्ता घालून मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतावे, जर मिरच्यांचे तुकडे नरम परतले तर भडंग लवकरच नरम होते. मग त्यात शेंगदाणे घालून चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे.
- 2
भाजलेल्या शेंगदाण्यावर तिखट पूड, हळद, कांदा लसूण मसाला आणि चविप्रमाणे मीठ घालून मिक्स करावे. मग त्यात कुरमुरे घालून चांगले मिक्स करावे.
- 3
मध्यम आचेवर भडंग छान कुरकुरीत होईपर्यंत सतत परतत रहावी, तळाला करपणार नाही याची काळजी घ्यावी.
- 4
मस्त कुरकुरीत भडंग खायला तयार आहे. भडंग गार झाल्यावर एअर टाईट डब्यात भरुन ठेवावी. या भडंग मधे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा घालून मिक्स करुन खायला पण छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16054442









टिप्पण्या