रवा - बेसन ढोकळा (Rava Besan Dhokla Recipe In Marathi)

#MDR
अगदी पटकन तयार होणारा आणि चविष्ट पदार्थ. अचानक आलेल्या पाहुण्यासाठी नाश्त्यासाठी एकदम उत्तम . माझ्या आईची रेसिपी, ती नेहमी बनवायची.
रवा - बेसन ढोकळा (Rava Besan Dhokla Recipe In Marathi)
#MDR
अगदी पटकन तयार होणारा आणि चविष्ट पदार्थ. अचानक आलेल्या पाहुण्यासाठी नाश्त्यासाठी एकदम उत्तम . माझ्या आईची रेसिपी, ती नेहमी बनवायची.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा, बेसन एकत्र करून त्यात दही मिसळून घ्यावे.मिश्रण खुप घट्ट किंवा पातळ नसावे, हवे असेल तर थोडे पाणी घालावे. व १५ मिनिटे झाकून ठेवावे.मिक्सरमध्ये २ -३ मिरच्या, आल व थोडी कोथींबीर बारीक वाटून घ्यावी व ही चटणी रवा - बेसन मिश्रणात घालावी,.हळद व मीठ घालावे.व मिसळून घ्यावे.
- 2
आता ईनो घालावे व छान मिसळून घ्यावे. व लगेच तेल लावलेल्या भांड्यात किंवा ढोकळे पात्रात घालावे.
- 3
नेहमी प्रमाणे कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये ढोकळा करून घ्यावा. (१५ -२०मिनिटे लागतात) आता फोडणीसाठी कढईत तेल घालावे, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी,जीरे,हिंग,कडीपत्ता, व साखर घालावी, १/२ कप पाणी घालावे. व पाणी उकळताच ही फोडणी तयार ढोकळ्यावर घालावी.
- 4
वरून कोथींबीर घालावी व थोडे थंड झाल्यावर काप करावे.झाला मस्त चटपटीत ढोकळा तयार.टोमॅटो सॅास व तळलेले मिरची सोबत गरम गरम सर्व्ह करावा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सेवया खीर (रमजान स्पेशल) (Sevai Kheer Recipe In Marathi)
- कैरी नारळ चटणी - नीर डोसा (Kairi Naral Chutney Neer Dosa Recipe In Marathi)
- भोकराचे लोणचे (Bhokrache Lonche Recipe In Marathi)
- रताळे आणि बटाट्याची मिक्स उपासाची भाजी (Ratale Batata Mix Upvasachi Bhaji Recipe In Marathi)
- आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)











टिप्पण्या