मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)

#TBR
"टिफीन बाॅक्स रेसिपी"
खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..
अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _
मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣
असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊
झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात..

कुकिंग सूचना
- 1
बटाटा साल काढून आवडीनुसार आकाराचे काप करून घ्यावेत.कांदा,टाॅमेटो, कोथिंबीर बारीक कापून घ्या.
- 2
ओल्या नारळाचा चव आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या.. वाटाणे व बटाटा गॅसवर सहा सात मिनिटे वाफवून घ्या.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे तडतडले की थोडी कोथिंबीर, कांदा घालून परतून घ्या. वाटलेले नारळाचा चव आणि लसूण मिश्रण घालून चांगले परतून घ्यावे. टाॅमेटो,सुके मसाले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- 4
वाफवलेले वाटाणे व बटाटा, मीठ घालून मिक्स करा व पाव कप पाणी घालून झाकण ठेवून दोन तीन मिनिटे वाफ काढून घ्या.. तयार आहे टिफीन बाॅक्स साठी भाजी..
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या