साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)

#UVR
#साबुदाणे_वडे
उपवास असल्यावर सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.
साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
#UVR
#साबुदाणे_वडे
उपवास असल्यावर सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणे दोन वेळा धुवून त्यात बुडेपर्यंत पाणी घालून रात्रभर भिजवून ठेवला. सकाळी साबुदाणे छान फुलून आले होते त्यात उकडलेले बटाटे सोलून स्मॅश करुन घालून,मग भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट, तिखट पूड, अर्धा चमचा पिठीसाखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि लिंबाचा रस घालून थोडे मळून घेतले.
- 2
साबुदाणा मिश्रणाचे गोल वडे थापून मध्यम आचेवर तेलात तळून घेतले मग एका प्लेटमधे टिश्यू पेपरवर काढून घेतले.
- 3
चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून चटणी वाटून घेतली.
- 4
एका प्लेटमधे गरमागरम साबुदाणे वडे आणि खोबर्याची चटणी घालून सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या (2)