रवा खवा कोकोनट लाडू (Rava khava Coconut Ladoo Recipe In Marathi)

#ASR #रवा_खवा_कोकोनट लाडू... #श्रावण स्पेशल...अगदी सूंदर लागणारे खुसखुशीत रवा, खवा आणि कोकोनट लाडू....
रवा खवा कोकोनट लाडू (Rava khava Coconut Ladoo Recipe In Marathi)
#ASR #रवा_खवा_कोकोनट लाडू... #श्रावण स्पेशल...अगदी सूंदर लागणारे खुसखुशीत रवा, खवा आणि कोकोनट लाडू....
कुकिंग सूचना
- 1
ओला नारळ फोडून त्याची काळी पाठ काढून त्याच्या पातळ स्लाईस करणे आणि मिक्सर जार मध्ये बारीक फिरवून घेणे.... आणि खवा/मावा पण काढून ठेवणे....
- 2
रवा आणि तूप मोजून घेणे गॅसवर कढईत अर्ध तूप टाकले आणि त्याच्यात रवा टाकून मंद आचेवर दहा-पंधरा मिनिटं खरपूस भाजून घेणे....
- 3
राहिलेले तूप टाकून परत एक मिनिट रवा भाजून घेणे नंतर त्यात बारीक केलेले कोकोनट टाकणे आणि परत पाच ते दहा मिनिटं रवा आणि खोबरं भाजून घेणे...
- 4
एका ताटात भाजलेले रवा खोबरे काढून घेणे नंतर दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून एक तारी पाक करायला ठेवणे....
- 5
दुसऱ्या पॅनमध्ये खवा मंद आचेवर भाजून घेणे नंतर तयार झालेला एकतारी पाक त्या खव्यामध्ये टाकणे....
- 6
खव्यामध्ये गरम पाक टाकून छान मिक्स करून घेणे आणि नंतर त्यात रवा आणि भाजलेले कोकोनट मिक्स करणे....
- 7
मिक्स केलेल्या मिश्रणात वेलची पूड आणि किसमिस टाकून मिक्स करणे आणि अर्धा तास झाकून ठेवणे मध्ये एक दोन वेळा हलवून मिक्स करणे....
- 8
नंतर त्याचे अर्धा तासाने लाडू वळून घेणे आणि देवाला रव्याचे दाखवून सर्व्ह करणे....
- 9
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes






























टिप्पण्या (9)