पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)

#मेथी लाडू
हे मेथीचे लाडू लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही पौष्टिक म्हणून मधल्या वेळेला खायला द्या. मी यात प्रथमच गुळ पावडर पीतांबरी ब्रँड ची वापरली आहे. ती थोडी चरचरीत लागते म्हणून मिक्सरमध्ये मिश्रण फिरवावे लागते. तसेच गोडीलाही कमी वाटली म्हणून मी अर्धा साधा गूळ चिरून घातला आहे. यात तुम्ही खारीक पावडर, काळ्या मणुकाही वापरू शकता.

कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप गरम करून त्यात डिंक घालून फुलवून घ्या आणि बाजूला काढा. गव्हाचे पीठ तुपावर खमंग भाजून घ्या. (प्रथम कोरडच पीठ भाजा नंतर थोडं थोडं तूप घालून भाजा).
- 2
सुकं खोबरं पण थोडं भाजून बाजूला काढा. मेथी थोडी भाजून मिक्सरवर पावडर करा. हालीम थोडे गरम करून बाजूला काढा.
- 3
परातीत भाजलेलं गव्हाचं पीठ, मेथीची पूड, हालीम, वेलची-सुंठ-जायफळ पावडर, गुळ बारीक चिरून घाला व हाताने चांगला मळून एकजीव करा. (मी गुळ पावडर अर्धी व साधा गुळ अर्धा बारीक चिरून घातला) मिक्सरमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून फिरवून घ्या म्हणजे गुळ सर्व मिश्रणात चांगला मिक्स होईल. सर्व फिरवून परातीत काढा.
- 4
आता त्यात भाजलेलं सुकं खोबरं व डिंक हाताने चुरून घाला.बदाम थोडे गरम करून तुकडे करून घाला. सर्व एकजीव करा. लाडू वळताना थोडे तूप घालून एकजीव करून लाडू वळा. तयार आहेत पौष्टिक मेथीचे लाडू.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)