पुरणाचे दिंड (Puranache Dind Recipe In Marathi)

#SSR
आजची माझी 200वी रेसिपी cookpadवर लिहीताना खूप आनंद होत आहे ...तेही श्रावण महिना आणि नागपंचमी या मुहुर्तावर!! 200 रेसिपीजचा टप्पा पार करताना गोडधोड तर काहीतरी व्हायलाच हवे....म्हणून नागपंचमीनिमित्त खास पारंपारिक पुरणाचे दिंड!
नागपंचमी हा तमाम महिलांचा सण.भारतीय संस्कृतीत नागाला अनन्यसाधारण महत्व आहे.शंकराच्या गळ्याभोवती हलाहल प्राशन करुन तो रुळला आहे.भगवान विष्णू शेषशय्येवरच आरुढ झालेले आहेत.गणपतीच्या पोटाभोवती नागाचाच विळखा आहे.कालिया नागाचे मर्दन करुन श्रीकृष्ण सुद्धा त्यावरच विराजमान झाला आहे.अशा प्रकारे ही नागदेवता प्रसन्न व्हावी म्हणून पूजा केली जाते.
पावसाने आलेली मरगळ थोडीशी दूर व्हावी यासाठी हे सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. नागपंचमीला नागाची पूजा करतात.लाह्या-दुधाचा व पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य दाखवला जातो.नागाच्या वारुळाची पूजा करतात.या दिवशी शेत नांगरत नाहीत.चुलीवर तवा ठेवत नाहीत.पावसाळी हवेला पचनास हलके म्हणून उकडलेले पदार्थ सेवन केले जातात.यासा ठीच पुरणाचे दिंड, पातोळ्या हे पदार्थ आवर्जून करतात.श्रावणातील मंगळागौर,रक्षाबंधन असे व्रतं व सण तनमनाला ताजंतवानं करतात.सासर-माहेरची जवळची माणसं भेटल्याने आनंद द्विगुणित होतो.
मनभावन हा श्रावण ... भिजवी तन,भिजवी मन हा श्रावण🐍🌿🌲🌳🌿

कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ स्वच्छ निवडून, धुवून नंतर चार तास भिजवावी.म्हणजे पुरण छान शिजते.नंतर कुकरमध्ये कटाच्या आमटीसाठी जेवढा कट हवा आहे त्याप्रमाणात पाणी घालावे.व डाळ शिजवून घ्यावी.
- 2
मध्यम गँसवर कुकर ठेवावा.साधारण अर्ध्या तासामध्ये पुरण शिजते.कुकर थंड झाल्यावर रोळीवर डाळ उपसून त्यातील पाणी (कट)पातेल्यात निथळू द्यावे.
जेवढी डाळ...तेवढाच गूळ असे प्रमाण घ्यावे. - 3
गँसवर कढई तापत ठेवावी. त्यात निथळलेली डाळ व गूळ घालून मिश्रण चटका देण्यास ठेवावे.गूळ पूर्ण विरघळू लागतो.सतत पुरण हलवत रहावे.आणि शिजणाऱ्या पुरणाच्या कडा उलथण्याने सतत काढाव्यात. वरील प्रमाणाच्या पुरणास चटका देण्यास अर्धा तास लागतो.मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागते.उलथणे पुरणात घट्ट उभे राहिले म्हणजे पुरण झाले असे समजावे.यावर किसलेले जायफळ व वेलचीपूड घालावी.
- 4
शिजलेले पुरण,गरम असतानाच पुरणयंत्रातून बारीक जाळीने गाळून घ्यावे.
- 5
पुऱ्यांना भिजवतो तशी घट्ट कणिक भिजवून तासभर भिजू द्यावी.पुरी एवढीच गोळी लाटावी.त्यात छोटासा पुरणाचा गोळा घालावा. व समोरासमोरच्या बाजू दुमडाव्यात.असे सर्व दिंड तयार करावेत.मोदकपात्रात किंवा चाळणीवर किंवा इडलीपात्रात १०मिनिटे दिंड उकडून घ्यावेत.
काढताना यावर थोड्या गार पाण्याची धार सगळीकडून सोडावी.म्हणजे दिंड चटकन सुटतात.चिकटत नाहीत. - 6
देवाला नैवेद्य दाखवून गरमागरम दिंड साजूक तूप घालून वाढावेत.
टिप्स
कूकस्नप्स
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या