कुर्डुची भाजी (Kurduchi Bhaji Recipe In Marathi)

#रानभाज्या
पावसाळ्यात अगदी रानभाज्यांची रेलचेल असते. अशीच एक औषधी गुणधर्म असणारी रानभाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. कुर्डु नाव असलेली ही रानभाजी मुतखडा, मधुमेह, रक्तदाब, बद्धकोष्ठता, जुनाट खोकला, कफविकार, मासिक पाळीचा त्रास यावर खूप औषधी आहे. या भाजीची पाने हार्टच्या आकाराची असून पानांच्या कडा व देठ हे लालसर दिसतात. याची पाने व पुढचा कोवळा भाग खुडून ४-५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही भाजी जास्त वाढून जून झाली की त्याला सफेद रंगाच्या तुऱ्यासारखी फुले येतात जी आपण दसऱ्याला तोरणात वापरतो. काही ठिकाणी या फुलांना कोंबडा म्हणतात व भाजीला कुरडई असेही संबोधतात. ही भाजी फक्त पावसाळ्यातच उगवते त्यामुळे इतरवेळेला मिळत नाही तेव्हा याच्या फुलांमध्ये एकदम छोट्या काळ्या रंगाच्या बिया असतात तुळशीच्या बियासारख्या त्यांचं चूर्ण करून पाण्यातून घ्यायचं. तसेच ही भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने जुलाब होतात त्यामुळे प्रमाणातच खावी.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजी साफ करून स्वच्छ धुवून घ्या. नंतर बारीक चिरून घ्या. (काही ठिकाणी या भाजीची पाने न चिरता पाण्यात वाफवून घेऊन मग पिळून चिरतात त्यामुळे त्यातील उग्रपणा नाहीसा होतो) मी अशीच धुवून चिरली.
- 2
कढईत तेलात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कांदा परतून त्यावर चिरलेली भाजी घालून मोठ्या आचेवर शिजवा. मध्ये ढवळत रहा. या भाजीला पाणी सुटून खूप आळते त्यामुळे मीठ नंतरच घाला. ही भाजी शिजताना झाकण ठेवू नका.
- 3
पाणी पूर्णपणे आटले की त्यात ओलं खोबरं घाला. मस्त गरमागरम ज्वारीच्या किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करा कुर्डुची भाजी. ही भाजी लोखंडी कढईत केली तर उत्तम, फक्त भाजी शिजवल्यावर लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावी नाहीतर काळी पडते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या