मायाळूची भाजी (Mayaluchi Bhaji Recipe In Marathi)

#रानभाज्या
आजची रानभाजी आहे मायाळूची. गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची तसेच पालकच्या भाजीप्रमाणे जिरण्यास हलकी असते. सांध्याच्या ठिकाणच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे.

कुकिंग सूचना
- 1
भाजीची फक्त पाने व पुढची कोवळी देठासहित पाने खुडून स्वच्छ पाण्यात तीनचार वेळा धुवून घ्यावीत.नंतर बारीक चिरावी
- 2
कढईत तेलात जीरे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा व भिजवलेली चणाडाळ घालून परतावी, नंतर चिरलेली भाजी घालून मीठ घालावे.
- 3
पाणी जास्त सुटले तर गॅस मोठ्या आचेवर ठेवावा, पाणी आटले की गॅस मंद करून शिजवावे, शिजली की ओलं खोबरं घाला. तयार आहे मायाळूची भाजी. ही भाजी पातळ ही करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या