हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)

MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.
हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)
MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.
कुकिंग सूचना
- 1
बटाट्याची सालं काढून किसून घेणे. मग बटाट्याचा कीस पाण्यात घालून ठेवणे, यामुळे बटाट्याचा कीस काळा पडत नाही. तो बटाट्याचा कीस पाण्यातून घट्ट पिळून एका बाऊलमध्ये काढून घेणे.
- 2
बटाट्याच्या कीस मध्ये कॉर्नफ्लॉवर, हळद, तिखट, मीठ आणि एक अंड फोडून घालणे. (अंड आवडत नसेल तर घालू नये)
- 3
बटाट्याचा कीस मिक्स करून घेणे. नंतर पॅनमध्ये बटर आणि तेल घालून त्यावर बटाट्याच्या केसाचे मिश्रण पसरवणे. आणि हॅश ब्राऊन दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणे. दोन बटाट्याचे चार मध्यम आकाराचे हॅश ब्राऊन होतात.
- 4
गरमागरम खरपूस हॅश ब्राऊन टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या (2)