मेथी वडा (Methi Vada Recipe In Marathi)

#HV
हिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात बाजारात दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी करून पाहायलाच हव्यात ना.... तर आज अशीच एक मेथीची रेसिपी करून पाहिली आणि सर्वांना आवडली.. म्हटलं चला मैत्रिनींना share करू या. तर तुम्ही ही करून बघा हे मेथीचे वडे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, जीरे, धने, बडीशेप घालून जाडसर खर्डा वाटून घ्या.
- 2
वाडग्यात पोहे पाण्यातून दोन वेळा धुवून निथळत ठेवा. पंधरा मिनिटानंतर ते हाताने चुरडून मळून घ्या. त्यात चिरलेली कोथिंबीर, चिरलेली मेथी, खर्डा, ओवा, तिखट, हळद, साखर, मीठ, तेल, तीळ, हिंग घाला.
आता त्यात बेसन, उभा चिरलेला कांदा घालून चांगलं एकजीव करा. - 3
मिश्रणाचे चपटे वडे करून घ्या. पॅनवर तेलात खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. फ्राय झाले की टिशू पेपरवर काढा. हे झाले मेथीचे वडे तयार. हे मेथी वडे हिरव्या चटणीबरोबर व टोमॅटो सॉसबरोबर मस्तच लागतात.
- 4
चटणीसाठी :
मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, जीरे, आलं, कोथिंबीर, पुदिना, शेंगदाणे, ओलं खोबरं, सैंधव मीठ, साधं मीठ, पाणी घालून वाटून घ्या. चटणी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या