स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)

भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची....

कुकिंग सूचना
- 1
स्पेशल मसाला बनविण्यासाठी : प्रथम धणे व जीरे थोडे गरम करून बाजूला काढा. नंतर त्याच पॅनमध्ये तेल घालून लसूण पाकळ्या परतून शेंगदाणे भाजून घ्या. त्यातच तीळ, डाळे घाला. हे मिश्रण थोडं बाजूला करून त्यातच सुकं खोबरं घालून भाजा. थंड करायला ठेवा. मिक्सरमध्ये धणे जीरे वाटून घ्या त्यातच भाजलेले सर्व मिश्रण घालून पल्स मोडवर फिरवा. आता त्यात तिखट, संडे मसाला किंवा जो उपलब्ध असेल तो मसाला व मीठ घालून परत एकदा फिरवा. हा मसाला जाडसरच वाटायचा. तयार आहे भरलेल्या भाज्यांचा स्पेशल मसाला...
- 2
भरली वांगी बनविण्यासाठी : कढईत तेल घालून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट घाला.
- 3
वांग्यांना चिरा देऊन त्यात वरील बनवलेला स्पेशल मसाला भरा व कढईत टाका. बटाटे छोटे घेऊन त्यांनाही चिरा देऊन त्यात मसाला भरून टाका. थोडा १ चमचा मसाला असाच वरून घाला. थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
- 4
वांगी व बटाटा शिजला की गॅस बंद करा. ही भरलेली वांगी अप्रतिम लागतात भाकरी बरोबर.....
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)