मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi)

#JLR
मला असं वाटतं मुगाची धिरडी सगळेच जण करतात पण मी हिरव्या मुगाची धिरडी न करता पिवळ्या मुगाची धिरडी केली आहे. स्पेशल घरी मी उगवलेली त्यात लसणाची पात टाकून हे धिरडं केलेला आहे. खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा. आज जेवणाला पोळी भाजीचा कंटाळा आला म्हणून ही रेसिपी केली.

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मुग स्वच्छ निवडून सहा ते सात तास भिजवावे. त्यानंतर त्याला निथळून रात्रभर ठेवून मोड येऊ द्यावे.
- 2
एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, पातीचा लसूण,जिरं, मीठ,मोड आलेले मूग आणि तांदळाची पिठी हे सर्व एकत्र पाणी घालून वाटून घ्यावे.
- 3
वाटलेल्या पिठात धने जीरे पूड घालावे अर्धा चमचा कच्च तेल घालून पीठ छान फेटून घ्यावं. तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पीठ घालून घ्या.
- 4
पीठ घातल्यावर लगेच डावाने धिरडं पसरवून घ्यायचं थोडसं तेल घालून छान खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचं. मस्त हिरव्या चटणी बरोबर हे धिरडं खायला द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या