आंबट बटाटा-रस्सा भाजी (Ambat Batata Rassa Bhaji Recipe In Marathi

#JLR
#लंच_रेसिपीस
#आंबट_बटाटा_रस्सा_भाजी
नवीन वर्षाच्या सुरुवातीला छान सात्विक जेवण बनवलं. ३१ डिसेंबरला भरपूर प्रमाणात व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी छान सात्विक जेवण बनवलं. वरण भात बासुंदी पुरी श्रीखंड आणि भाजी मधे छान चविष्ट आंबट बटाटा भाजी केली. या आंबटगोड भाजीमुळे जेवणाची रंगत वाढली. भात, चपाती, पुरी कशाबरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. करायलाही अगदी सहज सोपी आणि चविष्ट अन् झटपट तयार होणारी आंबट बटाटा या भाजीची रेसिपी पुढे देत आहे.

कुकिंग सूचना
- 1
बटाट्याची सालं काढून त्याच्या उभ्या फोडी करून घेऊन त्या पाण्यात ठेवाव्या मग फोडी काळ्या पडत नाहीत. आंबट बटाटा भाजी मधे उभ्या फोडी छान दिसतात. मग ओलं खोबरं, धणे, मिरे आणि चिंच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
- 2
कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी, दहा बारा मेथी दाणे, हिंग घालून त्यात तिखट पूड, हळद घालून लगेच जरासं पाणी घालावं त्यामुळे रस्सा छान रंगाचा दिसतो. मग त्यात बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करून ओल्या खोबऱ्याचे वाटण घालून मिक्स करावे. नंतर मीठ आणि पाणी घालून दोन शिट्या होईपर्यंत शिजवावे.
- 3
शिजल्यावर त्यात चविसाठी थोडासा गुळ घालून मिक्स करावे. मस्त आंबट गोड चविची बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली.
- 4
ताटामधे इतर पदार्थांच्या बरोबर ही आंबटगोड चविची आंबट बटाटा भाजी जेवणाची लज्जत वाढवते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या