शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi)

#शेगांव कचोरी(ओल्या वाटाण्याची)
सध्या मस्त थंडी पडली आहे बाजारात छान मटार आले.तर मस्त कचोरी करण्याचा बेत आखला.
शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi)
#शेगांव कचोरी(ओल्या वाटाण्याची)
सध्या मस्त थंडी पडली आहे बाजारात छान मटार आले.तर मस्त कचोरी करण्याचा बेत आखला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम २वाटी मैदा व पाव वाटी गव्हाचे पीठ किंचित मीठ त्यात २टेबलस्पून कोमट तेल घालून पीठ घट्टसर भिजवा.१५ते२०मिनिटे झाकून ठेवा.
- 2
तोपर्यंत सारण तयार करून घ्या.
गॅस चालू करून त्यावर कढई तापत ठेवा त्यात १चमचा धने,१चमचा बडीशेप,१/२tea स्पून तीळ १चमचा बेसन १वाटी मटार भाजून घ्या.
नंतर तेल घालून त्यात लसूण पाकळ्या,भाजलेले साहित्य तिखट,मीठ, कोथिंबीर,काळा मसाला,आमसूल १/२इंच परतून घ्या.थंड झाल्यावर मिक्सर मधून जाडसर काढा.
१५ते २०मिनिटे झाली मळलेला पिठाला तेल लाऊन मऊ करा.त्याचे छोटे गोळे बनवा.त्याची वाटी करा त्यात सारण भरा. पुरणपोळी प्रमाणे सर्व बाजू बंद करा अलगद पुरी लाटा सोनेरी रंगावर तळून घ्या. हिरवी मिरची तळा,तिला मीठ लावा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes





टिप्पण्या