गावरान पद्धतीने चाकवताची भाजी (Gavran Chakvatachi Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
गावरान पद्धतीने चाकवताची भाजी (Gavran Chakvatachi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
चाकवताची भाजी नीट करून स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी शेंगदाणे, चणाडाळ घालून शिजवून घ्यावी. भाजीतील शेंगदाणे, डाळ शिजल्याची खात्री करून, भाजी उतरवावी. फोडणीसाठी लसूण ठेचून घ्यावा.
- 2
शिजलेली भाजी कुस्करून त्यात शेंगदाण्याचे कुट, बेसन मिक्स करून भाजी छान एकजीव करावी. गॅसवर कढईत आवश्यकतेनुसार तेल गरम करून त्यात जीरे, लसणाची फोडणी करावी व त्यावर भाजी फोडणीला घालावी.
- 3
भाजी फोडणीला दिल्यावर चवीनुसार मीठ घालून, ती छान शिजू द्यावी. तयार चाकवताची भाजी ज्वारी, बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16769502












टिप्पण्या