झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)

#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये 3 मोठे चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि 1 कांदा, 2 टोमॅटो, 7-8 काळेमिरी, दगड फुल, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आले घालून वाटून घेतलेला मसाला, आणि कोथिंबीर हिरवी मिरचीचे वाटण घालून ते तेलामध्ये चांगले परतून घेतले.
- 2
मग त्यात 400 ग्रॅम स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुऊन घेतलेले चिकन घालून ते चांगले परतून घेतले. नंतर त्यात 1मोठा चमचा मिक्स मसाला, 2मोठे चमचे कांदा सुके खोबरे भाजून, वाटून घेतलेला मसाला घालून, चवीनुसार मीठ घालून ते चांगले परतून घेतले. आणि त्यात 2 कप पाणी घालून, झाकण ठेवून चांगले शिजवून घेतले.
- 3
आणि आता तयार झालेले झणझणीत गावरान चिकन एका भांड्यात काढून घेतले.
- 4
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले झणझणीत गावरान चिकन. हे चिकन तांदळाच्या भाकरी बरोबर, भाता बरोबर खूप सुंदर लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या