शेपूची भाजी

शेपूची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. पण ही भाजी अत्यन्त गुणकारी पौष्टिक आहे. पोटाचे आरोग्य राखण्यासाठी ही भाजी नेहमी आपल्या आहारात असणे आवश्यक आहे. शेपूची भाजी मूगडाळ व शेंगदाण्याचे जाडसर कुट घालून बनविली जाते.

कुकिंग सूचना
- 1
शेपूची भाजी व्यवस्थित नीट करून स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. मिरची चिरावी, लसूण ठेचून घ्यावा, शक्यतो खलबत्त्यात शेंगदाणे जाडसर कुटून घ्यावेत.
- 2
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मिरची व लसूण फोडणीला घालावे. या फोडणीवर शेपूची भाजी घालावी, जाडसर शेंगदाणे कुट, धुतलेली मुगडाळ, व आवश्यकतेनुसार मीठ घालून परतावे. त्यानंतर पॅनवर झाकण झाकून भाजी शिजू द्यावी.
- 3
मुगडाळ बोटचेपी झाली की, व भाजी शिजल्याची खात्री करून गॅस बंद करावा. ही शेपूची भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या