कुकिंग सूचना
- 1
बटाटे साल काढण्या इतपत अर्ध कच्चे शिजवून घ्यावेत. त्यानंतर ते तेलात फ्राय करून घ्यावेत. सोनेरी ब्राऊन रंगावर तळून घेतलेले बटाटे बाजूला ठेवावेत.
- 2
त्यानंतर 2 चमचे तेलावर कांदा, टोमॅटो, काजू, लसूण, आले भाजून थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यावेत. गरम मसाला शेकून त्याची पावडर करून घ्यावी.
- 3
तळलेले बटाटे लाल तिखट व मीठ घालून परतून डिशमध्ये काढून घ्यावेत. पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून तमालपत्र फोडणीला घालावे. त्यानंतर वाटलेले वाटन कडेने तेल सुटेपर्यंत परतावे. दही घालावे, तिखट, गरम मसाला पावडर घालून सर्व एकसारखे परतावे.
- 4
मसाला परतल्यावर त्यात बटाटे घालावेत. आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजू द्यावे. ग्रेव्ही दाटसरच ठेवावी.
- 5
तयार "दम आलू" रोटी, नान, चपाती बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16834299

















टिप्पण्या