मेथी गाजर पराठे

#RJR ... रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काय करावे असा प्रश्न पडला की घरात जे काही असेल त्याचे पराठे करून खायचे.. सोबत एखादी चटणी किंवा लोणचं आणि अर्थातच कांदा असले की छान भरपेट जेवण होते. झटपट होणारे असे मेथी आणि गाजर टाकून केलेले पराठे

कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे गाजर किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये कणिक आणि बेसन घ्यावे.
- 2
आता त्यात चिरलेली मेथी आणि गाजर टाकावे. त्याचप्रमाणे तीळ, ओवा, हळद, तिखट, मीठ, धणेपूड आणि मॅगी मसाला टाकावा.
- 3
हाताने छान मिक्स करून घ्यावे. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याने कणिक भिजवून घ्यावी. तेल लावून कणिक दहा-पंधरा मिनिटे बाजूला झाकून ठेवा वी.
- 4
दहा पंधरा मिनिटांनी कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यावी. आता त्या कणकेचा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घ्यावा. तव्यावर तेल टाकून चांगला भाजून घ्यावा दोन्ही बाजूंनी.
- 5
अशा प्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यावे आणि चटणी लोणचे आणि कांद्यासोबत गरमागरम सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)