ब्रेडचा दहीवडा

झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.
ब्रेडचा दहीवडा
झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.
कुकिंग सूचना
- 1
एक कप दहयातील एक टेबलस्पून दही एका पसरट वाडग्यात काढून घेणे व त्यात किंचित मीठ व पाणी घालून साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवणे. उरलेल्या दह्यात थोडेसे पाणी घालून घेणे. चवीपुरती साखर व किंचित मीठ घालून घेणे व ते दही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणे.
- 2
उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेणे. व्यवस्थित कुस्करून घेणे. लाल तिखट, चाट मसाला, मीठ व जिरेपूड घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणे. काजूचे तुकडे व बेदाणे घालून घेणे.
- 3
सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व त्याचे समप्रमाणात गोल करून घेणे. ब्रेड घेऊन,त्याच्याकडा सुरीने कापून घ्यावे.
- 4
1टीस्पून पुदीना पावडर, 1टीस्पून जिरे पावडर, 1टीस्पून चाट मसाला, 1/2टीस्पून लाल तिखट,1/4 टीस्पून गरम मसाला,1/4 टीस्पून मीठ. सर्व एकत्र करून व्यवस्थित मिक्स करणे. चाट मसाल्यात मीठ असते त्यामुळे मीठ कमी घेतले. मिक्स करून हा मसाला एखादा डब्यात भरून ठेवा. तुम्ही हवा तेव्हा वापरू शकता.
- 5
कडा कापून घेणे किंवा एका मोठ्या वाटीने गोल कट करून घेणे. चौकोनी तुकडा किंवा गोल तुकडा घेऊन दह्याच्या पाण्यात भिजवून घेणे. दोन्ही हातावर स्लाईस ठेवून, दाबत त्यातील पाणी काढून घेणे. पाणी काढून घेतलेल्या स्लाईस वर बटाट्याचे एक गोळा ठेवणे व व्यवस्थित सर्व बाजूंनी दाबत त्याचा गोल करून घेणे.
- 6
अशाप्रकारे सर्व गोल करून झाल्यानंतर सर्विस डिशमध्ये ब्रेडचा दहिवडा ठेवून घेणे. त्यावर फ्रिजमध्ये थंड करत ठेवलेले दही घालून, वरून तयार करून ठेवलेला दहिवडा मसाला घालून घेणे.
- 7
नंतर चिंचेची चटणी व हिरवी चटणी घालून घेणे. सजावटीसाठी वरून बारीक शेव घालणे.
*खाण्यासाठी झटपट तयार होणारा ब्रेडचा दहीवडा.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या