बटाट्याच्या सत्वाचा शिरा

Sumedha Joshi @sumedha1234
बटाट्याच्या सत्वाचा शिरा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक बटाट्याचे सत्व कढईमध्ये गरम तुपात खमंग परतून घेतले.( बटाट्याचे सत्व म्हणजे आपण वाळवणासाठी कच्चा बटाटा किसून तो दोन-तीन वेळा धुतल्यावर ते पाणी जर रात्रभर तसेच ठेवून दिले आणि बटाट्याचा कीस पण रात्रभर पाण्यात ठेवल्यावर खाली जी पांढरी
पावडर तयार राहते होते त्याला बटाट्याचे सत्व असे म्हणतात त्याला आपण बटाट्याचा स्टार्च असेही म्हणू शकतो.) - 2
आता गॅसवर कढईमध्ये तूप गरम करून त्यात बटाट्याचे सत्व घालून ते तुपावर चांगले खमंग परतून घ्यायचे.
- 3
चांगले परतले गेल्यावर त्यात एका हाताने हळूहळू पातेल्यात दुध व केशर घालत दुसऱ्या हाताने सतत हलवत रहायचे म्हणजे गाठी होत नाहीत. नंतर त्यात साखर घालून परतून.. चांगली वाफ आणायची. मग वेलचीपूड घालून मिक्स करून घेतले.
- 4
तयार शिरा बाऊलमधे काढून त्यावर वरून ड्रआयफ्रूट काप घातले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16892991











टिप्पण्या