ठाणे#झणझणीत चिकन रस्सा

# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
कांदा खोबरे आले लसुण भाजुन त्याचे वाटण करून ठेवा, कोथिंबिर आलेलसुणाची पेस्ट करून ठेवा
- 2
कांदे चिरून ठेवा
- 3
चिकन स्वच्छ धुवुन त्याला हिरवीपेस्ट व हळद लावुन १०-१५ मिनिटे ठेवा
- 4
कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे, ठेचलेला लसुण, कडिपत्ता, मिरची व कांदे परतुन शिजवा नंतर त्यात काश्मिरी तिखट, धने जिरे पावडर, घरगुती तिखट मिक्स करून परता मॅरीनेट केलेले चिकन मिक्स करून ५ मिनिटे चांगले परतुन घ्या
- 5
नंतर त्यात चिकन मसाला व तयार वाटण मिक्स करून१ मिनिटे परता व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा चविनुसार मिठ टाका
- 6
ताट झाकण ठेवा ताटावर पाणी ठेवा १५-२० मिनिटे शिजवा आपले चिकन रेडी
- 7
प्लेटमध्ये झणझणीत चिकन रस्सा सोबत तांदळाची भाकरी, पोळ्या, उकडलेले अंडे, सलाद लिंबु देऊन डिश सर्व्ह करा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या (2)