कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे हिंग मोहरी जिरं मेथी दाणा व धने कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये शेंगदाणे खोबऱ्याचे काप व तीळ घालून मस्त एकजीव करावे व छान परतावे
- 2
मग त्यामध्ये हळद तिखट मीठ घालून मग मग गूळ घालावा व छान एकजीव करावे नंतर दाण्याचा खोबऱ्याचा व तिळाचा कूट घालून पाणी घालावे व छान उकळून गूळ मेल्ट होऊ द्यावा
- 3
मिश्रण छान शिजलं की शेवटी त्यामध्ये चिंचेचा कोळ घालावा व अजून दोन मिनिटं उकळू द्यावे व मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. थंड झाले की मिश्रण थोडं घट्ट होतं त्याप्रमाणे आपण याचं अंदाज घ्यावा गॅस बंद करावा आपलं पंचामृत खाण्यासाठी रेडी आंबट गोड तिखट अतिशय सुंदर असं पंचामृत होतं काहीजण यात गरम मसाला टाकतात मी मुद्दाम टाकत नाही.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17050145











टिप्पण्या