खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी

आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया -
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात काजू व दूध पावडर घेऊन बारीक पूड तयार करून घ्या. व बाजूला ठेवून द्या.
- 2
त्यानंतर एका पॅनमध्ये १ चमचा तूप घाला व ३ कप खोबऱ्याचा कीस घालून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे परतत भाजून घ्या. नंतर खोबरा कीस चा हलकासा रंग बदलतो.
- 3
त्यानंतर त्यात ११/२ कप दूध घाला. म्हणजे जेवढा खोबरा कीस घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये दूध घाला व एकत्र करा.आणि हे मिश्रण मंद आचेवर १० ते १२ मिनिटे परतत रहा.
- 4
नंतर त्यात काजू व दुध पावडर ची तयार केलेली पूड घाला. त्याने लाडूला छान चव येते. व नंतर आणखी थोडावेळ मंद आचेवर परतत रहा.
- 5
आता हे मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात १ कप साखर घाला व मंद आचेवर छान परतत राहा.
- 6
थोडा वेळाने साखर वितळायला लागेल व हे मिश्रण ओलसर होईल. मिश्रण सतत परतत राहायचे थोड्यावेळाने त्याचा गोळा तयार होईल. गोळा तयार होईपर्यंत सतत परतत राहायचं व छान भाजून घ्यायचं.
- 7
आता थोडा वेळ हे मिश्रण थोड थंड होऊ द्या. व हलकं गरम असतानाच त्याचे लाडू बांधून घ्यायचे.
- 8
लाडू बांधताना एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये खोबरा कीस घ्या. व लाडू बांधून झाला की त्याला त्या खोबरा कीस मध्ये घुळवून घ्या म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो.
- 9
अशाप्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू साधारण दोन दिवस बाहेर टिकतात व फ्रिजमध्ये ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा व कशी झाली ते आम्हाला कळवा.
- 10
टीप -
1. साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो. लाडू गोड हवे असल्यास त्यात अर्धी वाटी साखर जास्त घाला.
2. आपण लाडू मध्ये काजू बदाम चे काप करून सुद्धा घालू शकतो
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या