खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी

आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया -
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात काजू व दूध पावडर घेऊन बारीक पूड तयार करून घ्या. व बाजूला ठेवून द्या.
- 2
त्यानंतर एका पॅनमध्ये १ चमचा तूप घाला व ३ कप खोबऱ्याचा कीस घालून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे परतत भाजून घ्या. नंतर खोबरा कीस चा हलकासा रंग बदलतो.
- 3
त्यानंतर त्यात ११/२ कप दूध घाला. म्हणजे जेवढा खोबरा कीस घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये दूध घाला व एकत्र करा.आणि हे मिश्रण मंद आचेवर १० ते १२ मिनिटे परतत रहा.
- 4
नंतर त्यात काजू व दुध पावडर ची तयार केलेली पूड घाला. त्याने लाडूला छान चव येते. व नंतर आणखी थोडावेळ मंद आचेवर परतत रहा.
- 5
आता हे मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात १ कप साखर घाला व मंद आचेवर छान परतत राहा.
- 6
थोडा वेळाने साखर वितळायला लागेल व हे मिश्रण ओलसर होईल. मिश्रण सतत परतत राहायचे थोड्यावेळाने त्याचा गोळा तयार होईल. गोळा तयार होईपर्यंत सतत परतत राहायचं व छान भाजून घ्यायचं.
- 7
आता थोडा वेळ हे मिश्रण थोड थंड होऊ द्या. व हलकं गरम असतानाच त्याचे लाडू बांधून घ्यायचे.
- 8
लाडू बांधताना एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये खोबरा कीस घ्या. व लाडू बांधून झाला की त्याला त्या खोबरा कीस मध्ये घुळवून घ्या म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो.
- 9
अशाप्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू साधारण दोन दिवस बाहेर टिकतात व फ्रिजमध्ये ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा व कशी झाली ते आम्हाला कळवा.
- 10
टीप -
1. साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो. लाडू गोड हवे असल्यास त्यात अर्धी वाटी साखर जास्त घाला.
2. आपण लाडू मध्ये काजू बदाम चे काप करून सुद्धा घालू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
-
कणिक लाडू
#दिवाळीदिवाळीच्या फराळात लाडू हा पाहिजेच. कणिक लाडू गव्हाच्या पिठापासून बनवला जातो व खूप चविष्ट लागतो. Pooja M. Pandit -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राघवदास लाडू(Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#WE14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजआधी तयारी करण्याची गरज नाही झटपट तयार होणारा खूपच मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा रवा खोबरे लाडू म्हणजेच राघवदास लाडू तयार होतो!!! Vandana Shelar -
खवा - रवा लाडू (khava rava laddu reciep in marathi)
झटपट होणारे चविष्ट लाडू Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात. Amrapali Yerekar -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#gur#गणेशउत्सवस्पेशलरेसिपीगणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून मोदकाला प्राधान्य असतं त्यातही उकडीच्या मोदकांना त्याची रेसिपी तर आम्ही देतच आहोत. त्यासोबतच काही रेसिपीज ज्या तुम्ही चतुर्थीला करू शकता. त्यामधला एक बाप्पाचे आवडता नारळाचे लाडू चला मग आपण रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar -
-
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
सातूचे झटपट लाडू (satuche jhatpat ladoo recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap to bhik Anjali Taiमहीला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनाखूप खूप शुभेच्छा.आपल्या भारतीय खाद्य संस्कृतील हा एक पौष्टिक व गोडाचा झटपट होणारा प्रकारआहेघरात सातूचे पीठ तयार असले की पटकन व हेल्दी लाडू तयार होतात .मी किंचीत बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdanyache Ladoo Recipe In Marathi)
उपवासाची खास झटपट तयार होणारे.#UVRशेंगदाण्याचे लाडू Shilpa Ravindra Kulkarni -
खमंग मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरहे लाडू बिनपाकाचे आणि झटपट तयार होतात. हे लाडू पाकाच्या लाडू पेक्षा खूप रूचकर लागतात.माझ्या सासऱ्यांना असेच मऊसूत लाडू खायला आवडतात. म्हणून हे लाडू खास त्यांच्यासाठी...😊😊 Deepti Padiyar -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
पोह्याचे लाडू (pohyanche laddu recipe in marathi)
#cpपोह्याचे पोस्टीक लाडु तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय टेस्टी आणि झटपट होणारे लाडू kalpana Koturkar -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
पोह्यांचे लाडू (Poha Ladoo recipe in marathi)
#फोटोग्राफी ...पोशष्टिक आणी रूचकर असे हे पोह्यांचे लाडू पटकन होतात आणी सगळ्यांना आवडतात .. Varsha Deshpande -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cookpadindia #sweetrecipeरवा बेसन लाडू पाकातले सर्वांना आवडणारे लाडू Sakshi Nillawar -
अळीवाचे (हळीव) लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
#CookpadTurns6कूकपॅडचा वाढदिवस असल्याने गोड तर हवेच. तसेच थंडीचे दिवस असल्याने मी लाडू केले आहे.ही माझी 585 वी रेसिपी आहे. अळीवाचे लाडू शरीरासाठी पौष्टिक असतात.अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, फोलेट,बेटोकेरोटीन,इ,ए,सी ही जीवनसत्त्वे, प्रोटीन,फायबर हे आहेत.तसेच शक्तिवर्धक आहे. Sujata Gengaje -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
खोबरा किसाचे लाडू (khobra kisache ladoo recipe in marathi)
#लाडू आज जन्माष्टमी आणि आजच मला गिफ्ट पण मिळाले खूप खुश होते. मी मग ठरवले आज खोबरा किसाचे लाडू करायची बाल गोपाळला नैवद्य तसे तर माझ्या घरी सगळ्यांनाच आवडतात केल्याबरोबर सगळ्यांनी एक एक उचलला मी थोडेसेच केले लाडवाला खूप कमी वेळ आणि कमी सामग्री लागते आणि खायला एकदम मस्त खोबरा किसाचे लाडू माझ्या आयुष्यात हा पहिला पदार्थ मी बनवला सगळ्यात पहिले तो पण खूप कमी वेळामध्ये होणार आणि कमी सामग्री मध्ये कोणी पण बनवू शकते झटपट एकदम झकास 😀😀चला चला मग बनवूया मैत्रिणींनो खोबरा कीसाचे लाडू😋😋😋🤵 Jaishri hate -
सणासुदीचे खास गोड - दामटी चे लाडू
आमचा भागात खास केले जाणारे दामटी चे लाडू... हे बेसन पीठ वापरून बनतात.. घरात काही सण, विशेष प्रसंगी खावू वाटले की करतातच… लाडू म्हटलं की हेच लाडू जास्त केले जातात....मुलगी सासरी चालली की पूर्वी आवर्जून हे लाडू देण्याची प्रथा असे. अजूनही हे दिवाळी ला मुलीकडे पाठवतात हे लाडू. आता वयोमानानुसार घरात ज्येष्ठ लोकांना आरोग्याचा काही पथ्या मुळे बेसन खायला मनाई. या लाडू शिवाय तर राहु न शकणारे सगळे .. 🥰....फक्त मूग खायला परवानगी… त्यामुळे मी मूग डाळ वापरून केले.😊 मी पहिल्यांदाच हा प्रयोग करून पाहिला आणि सर्वांना प्रचंड आवडले. शिवाय मी सांगितल्या शिवाय कळलं देखील नाही की हे बेसनाचे नाहीयेत.. अप्रतिम चव शिवाय मुगा मुळे हलके.पथ्य असून ही घरात सगळ्यांना खाता आले मनसोक्त या मुळे खूप कौतुक केलं या कल्पनेच.प्रवासात न्यायला देखील उत्तम पर्याय.तुम्ही बेसन पीठ वापरून देखील करू ही शकता. 🪔🌼#TheMasalaBazaar Asmita Thube -
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आजची रेसिपी बुक ची पहिली गोड रेसिपी माझ्या आवडीचे मुगडाळ लाडू ते पण अगदी कमी तूप वापरून पटकन होणारे, करायला सोपे. मुगडाळ पौष्टिक असतेPradnya Purandare
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
मखाणे लाडू (Makhana Ladoo Recipe In Marathi)
झटपट होणारे लाडू. नवरात्री उपवासासाठी खास रेसिपी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
टिप्पण्या