नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा
नारळाची बर्फी तुम्ही
अंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता.
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा
नारळाची बर्फी तुम्ही
अंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण नारळ फोडून घेऊ.नंतर त्याचे बारीक काप करून मिक्सर मधून जाडसर वाटून घेऊ.
- 2
आता कढाई मध्ये तूप टाकू.त्यात वाटलेल नारळ छान परतवुन घेऊ.आता त्यात साखर घालून पुन्हा एक मिनिट परतवून घेऊ.आता त्यात दूध टाकून छान मिक्स करून घेऊ.
- 3
दोन मिनिटं शिजू देऊ. नंतर त्यात फ्रेश क्रीम टाकू.आणि मिक्स करून घेऊ.आता त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर तसेच काजू-बदामाचे काप घालून नीट मिक्स करून घेऊ.दोन मिनिटे परतून घेऊ.
- 4
आता गॅस बंद करू आणि एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घेऊ.नंतर त्यावर तयार नारळाचे मिश्रण घालून पसरवून घेऊ.आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घेऊ.
- 5
तयार आहे ओल्या नारळाची बर्फी.आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे गार्निश करून खाण्यासाठी नारळाची बर्फी सर्व करु. झटपट होणारी आणि एकदम सोपी ही नारळाची बर्फी खायला खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या