साखर पुरणपोळी (sakhar puran poli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
पुरणपोळी रेसिपी
पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पॉप्युलर स्वीट डिश आहे. मी ह्यात गुळाऐवजी साखरेचा वापर करून बनवले आहे .खूप मस्त ,सॉफ्ट बनली.
साखर पुरणपोळी (sakhar puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
पुरणपोळी रेसिपी
पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पॉप्युलर स्वीट डिश आहे. मी ह्यात गुळाऐवजी साखरेचा वापर करून बनवले आहे .खूप मस्त ,सॉफ्ट बनली.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम चण्याची डाळ कुकरमध्ये किंवा पातेल्यात शिजवून घ्या. आता त्यातील पाणी निथळून घ्या.
- 2
शिजवलेल्या डाळीमध्ये,साखर, वेलची पावडर,जायफळ पावडर टाकून डाळीचे पुरण वाटून घ्या.आता गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ,एक चमचा तूप, आणि पाणी घालून पीठ मळून घ्या.
- 3
वाटलेले पुरण पॅन मध्ये टाकून थोडे शिजवून घ्या.आता गव्हाचे पिठाचा पेढा घेऊन थोडेसे लाटून घ्या.नंतर त्यात पुरणाचे सारण भरून छान पोळी लाटून घ्या.
- 4
पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूने साजूक तूप घालून छान पैकी बनवून घ्या. छान सोनेरी रंगाची झाल्यावर तयार आहे आपली पुरणाची पोळी.
- 5
महाराष्ट्र मध्ये प्रत्येक सणाचे वेळी पुरणपोळी नैवेद्य म्हणून बनवली जाते. पुरण पोळीवर साजूक तूप घालून गरमागरम दुधाबरोबर खायला अत्यंत टेस्टी लागते.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या