हनी पॅनकेक (honey pancake recipe in marathi)

पॅनकेक लहान मुलांना खूपच आवडतात ,त्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूपच सोपी आणि चांगली रेसिपीआहे. हे पॅन केक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात, माझ्या मुलाची हि फेवरेट डिश आहे .

कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये मैदा,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, पिठीसाखर,मिठ व्यवस्थित चाळून घ्या. त्यात थोडे थोडे दूध घालून पातळसर बँटर करून घ्या.
- 2
त्यात व्हॅनिला इसेन्स व हनी घालून चांगले ढवळून घ्या.
- 3
बॅटरची कन्सिस्टन्सी खूप चांगली असली पाहिजे जेणेकरून ती चमच्याने सहज पॅन मध्ये ओतता येईल. एक पॅन घेऊन त्याला व्यवस्थित तुपाचा ब्रश फिरवून घ्यावा, पॅन गरम झाल्यावर त्यात चमचाने बॅटर बरोबर मधोमध ओतावे. गॅस कमी करून व त्यावर झाकन ठेवावे.
- 4
दोन मिनिटांनी पॅनकेकची दुसरी बाजू पलटावी. अशाप्रकारे लुसलुशीत असे पॅनकेक तयार होतात.
- 5
हे पॅन केक दिसायला अगदी लुसलुशीत, मऊसर आणि छान होतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या