मुहम्मरा (अरेबिक डिप) (Muhammara recipe in marathi)

#walnuttwists
अक्रोड पासून ट्विस्टेड रेसिपी बनवायची म्हटल्यावर मला पटकन "मुहम्मरा"च आठवलं. इतकी वर्षे अरेबिक देशात राहण्याचा काहीतरी फायदा तर करून च घेतला पाहिजे ना! 😉
"मुहम्मरा" किंवा "म्हम्मरा" ही एक फेमस अरेबिक डिप डिश आहे. लाल भोपळी मिरची, अक्रोड आणि ब्रेडक्रम्स् हे मुख्य घटक असलेल्या या डिशमध्ये देशपरत्वे घटकपदार्थ कमीजास्त होतात, त्यामुळे ह्याच्या चवीमध्ये प्रत्येक अरेबिक देशाची स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
जसं सिरीयामध्ये"अलेप्पो मिरची" आणि"ताहिनी"(तिळाची पेस्ट) घालतात. तर, लेबनीज् व्हर्जन मध्ये "टोमॅटो पेस्ट व सुमँक मसाला" वापरतात. मी टर्किश रेसिपी फॉलो करतेय जिथं भारतीय स्वयंपाकामध्ये वापरतो तशी लाल मिरचीची पेस्ट घालून "मुहम्मरा" बनवतात. हे सगळं असं असलं तरीही लाल भोपळी मिरची, अक्रोड आणि ब्रेडक्रम्स् ह्या ३ मुख्य घटकांना कुणीही छेडले नाही.
अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे "ग्रेनाडिन सिरप" किंवा डाळिंबापासून बनवलेले काकवी सदृश्य लाल रंगाचे सिरप! सध्याच्या परिस्थितीत कोथिंबीर, कढीपत्ता आणायला टाळावे लागते तर हे मिळवणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला गत होईल! (ऑनलाईन बाटलीची क्वांटिटी बघून.. 😂) त्याला पर्याय म्हणून मी एक छोटा चमचा मध वापरलाय. तसंच, ऑलिव्ह ऑईललाही पर्याय म्हणून तुम्ही तुमचे नेहमीचे तेल तापवून थंड करून वापरू शकता.
चला तर मग पाहुया अक्रोडची ट्विस्टेड तरीही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी "मुहम्मरा"!

कुकिंग सूचना
- 1
प्रथम लाल भोपळी मिरचीला तेलाचे बोट फिरवून भरीत करताना वांगी भाजतो तशी भाजून घ्यावी. अक्रोड आणि ब्रेडक्रम्स् सुध्दा शेकवून घ्यावे.
- 2
भोपळी मिरचीची वरची स्कीन काढून तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढावे. त्यातच मग अक्रोड, ब्रेडक्रम्स्,भाजलेले जीरे, लसूण पाकळ्या, मध, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडे थोडे तेल घालत छान वाटून घ्यावे.
- 3
एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. चिप्स, टॉर्टिआज् साठी डिप / तर ब्रेड, खुबूस वर स्प्रेड म्हणून / आणि कबाब वगैरेंसाठी सॉससारखे सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (12)