सोलकढी (solkadhi recipe in marathi)

#KS1
#सोलकढी
आज मी कोकण स्पेशल सोलकढी बनवली खूप छान झाली आहे. सोलकढी शरीरासाठी खूप गुणकारी असे पेय आहे.ह्यातील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात.
आपल्याला माहितीच आहे थोड्या थोडया अंतरावर एकच रेसिपीचा प्रकार थोडाफार बदल करून बनविला जातो. मूळ जीन्नस तेच असतात पण एकाद दोन सामग्री आपल्या आपल्या पद्धती नुसार aad केल्या जातात.तसाच सोडकढी पण 10-12प्रकारे बनविली जाते. त्यातलाच एकाप्रकारे मी बनविली आहे नक्की try करा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात नारळाचे काप, लसूण पाकळी, आली, बिट, मिरची एकत्र करून पाऊण ग्लास पाणी घालून वाटून घेतले. आणि फोटोत दाखविल्या प्रमाणे नारळाचे दूध घट्ट गाळून घेतले. पुन्हा थोडे पाणी घालून ही प्रक्रिया 2-3वेळा केली.
- 2
भिजत ठेवलेले कोकम 5-मिनिट शिजवुन घेतले त्यामुले मऊ होते. आगळ छान बनतो. आता आगळ थंड करून. नारळाच्या दुधात गाळणीने गाळून घातला आणि मिक्स केला. नंतर त्यात, जिरं पूड, मिर पूड,मीठ घालून छान ढवळून घेतले. वरून कोथिंबीर घालून. अर्धा तास फ्रिज मध्ये थंड केले.
- 3
आणि थंड थंड सोलकढी सर्व्ह केली.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या