बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

#cpm8 बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते. तर अशा बहुगुणी बाजरीची खिचडी मी बनवली आहे.

कुकिंग सूचना
- 1
अर्धी वाटी बाजरी पाण्याने धुवून अर्धा तास निथळत ठेवली. कोरडी झाल्यावर बाजरी खलबत्त्यात टरफलं निघतील अशा तर्हेने कुटून घेतली. अगदी पावडर करायची गरज नाही.
अर्धी वाटी मुगडाळ आणि १ वाटी तांदूळ स्वछ धुवून निथळत ठेवले. २ छोटे कांदे, १ टोमॅटो, २ हिरव्या तिखट मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आलं बारीक चिरून ठेवून दिले. - 2
कुकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी - जीरे - हिंग - हळद - कढीपत्त्याची फोडणी द्यायची. मिरच्या, आलं, लसूण परतून घ्यायचं. कांदा मऊसर होईपर्यंत तेलात परतायचा. टोमॅटो शिजेपर्यन्त ढवळून घ्यायचा. २ चमचे गोडा मसाला आणि २ चमचे मसाले भाताचा मसाला घालून तेल सुटेपर्यन्त परतून घ्यायचं.
मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने तेल सुटलेलं असेल. मग यात निथळलेले तांदूळ, मूग डाळ, बाजरी परतून घ्यायची. - 3
नेहमी भाताला पाणी घालतो त्यापेक्षा थोडं जास्तीच पाणी घालून एक उकळ येऊ द्यायची. मीठ गरज असल्यास घालायचं आणि कुकर ला २ शिट्या काढायच्या.
बाजरीची खिचडी तयार. वाफाळत्या खिचडीवर चमचाभर तूप सोडून, खाताना लिंबाचा रस वरून पिळून, पापड किंवा लोणच्यासोबत ताव मारायचा :)
~ सुप्रिया घुडे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (7)