पुडाची वडी

#wadi
Pudachi wadi is awesome snacks served as side dish
पुडाची वडी
#wadi
Pudachi wadi is awesome snacks served as side dish
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन घ्या आणि एका कपड्यावर पसरून दोन तीन तास ठेवा, जेणेकरून कोथिंबीर संपूर्णपणे कोरडी होईल त्यांनंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- 2
एका ताटात सुके खोबरे, खसखस कूट, तीळाचा कूट, शेव, धणे-जीरे पूड, हळद, तिखट,गोडा मसाला, बेदाणे, आमचूर पावडर, बडीशेप घालून व्यवस्थित एकत्र करा. लिंबाचा रस घालून छान एकजीव करा.
- 3
वरील मिश्रणात कोथिंबीर व कारळ्याचे कूट घालून व्यवस्थित मिक्स करा.
- 4
आता एका परातीत बेसन, मैदा, मीठ, तिखट, हळद आणि गरम केलेले मोहनाचे तेल घालून घट्ट गोळा भिजवून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा पुरीसारखी कडक कणीक भिजवा.
- 5
कांदा-लसूण तिखटात 2 चमचे तेल घालून छान मिक्स करा. आता भिजवलेली कणीक परत एकदा चांगली मळून त्याचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची पोळी लाटून त्यावर कांदा-लसूण तिखटाचे मिश्रण पसरवा.
- 6
प्रत्येक गोळ्याची पोळी लाटून त्यामध्ये वरील सारणाचे दोन टेबलस्पून मिश्रण घाला. पोळीचा घट्ट रोल करा. पोरीला तिरके तिरके कापून वड्या पाडाव्यात.
- 7
वड्या फोटोत दाखवल्या प्रमाणे दोन्ही बाजूने हलकेच घट्ट दाबा त्यामुळे सारण बाहेर येणार नाही. आता या वड्या चाळणीत ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्या. अशाप्रकारे सर्व वडी तयार करून घ्या.
- 8
नंतर एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर वाफवलेल्या सर्व वड्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या. तयार झाल्या आपल्या पुडाच्या वड्या.. तयार झालेल्या खमंग, खरपूस चमचमीत पुडाची वडी एका डिशमध्ये ठेवून सर्व करा.
- 9
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या