ब्रेड पॅटिस (Bread Patties Recipe In Marathi)

ब्रेड पॅटिस (Bread Patties Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये एक कप बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, १/२ चमचा ओवा,हळद, घरगुती मसाला १/२ चमचा असे मिक्स करून घ्यावे
- 2
त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे करावे व १० ते १२ मिनिटे बाजूला ठेऊन द्यावे
- 3
त्यानंतर बटाटी उकडून घेऊन स्मॅश करावी
- 4
त्यानंतर एका कढईत २ चमचे तेल घालून त्यात जीरे, लसूण व हिरवीमिरची याचे तुकडे तसेच आले लसूण पेस्ट घालून फोडणी करावी
- 5
नंतर त्यात स्मॅश केलेला बटाटा घालून परतून घ्यावा, त्यात १ चमचा धने जीरे पावडर, चवीनुसार मीठ, हळद१/२ चमचा, मसाला १/२ चमचा घालून मिक्स करून घ्यावे व झाकण ठेऊन एक वाफ आणावी.म्हणजे आपली पॅटिस ची भाजी तयार
- 6
भाजी थंड होईपर्यंत कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, आले, यांची चटणी तयार करून घ्यावी
- 7
त्यानंतर एका कढईत तेल गरम करून घ्यावे, यातील एक छोटा चमचा तेल भिजवलेल्या बेसनामध्ये घालावे व पुन्हा बेसन एकजीव करून घ्यावे.
- 8
त्यानंतर ब्रेड चा एक स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावावी, नंतर त्यावर तयार भाजी पसरून घ्यावी व दुसरा ब्रेडस्लाइस त्यावर दाबून घ्यावा. अशाप्रकारे उरलेली पॅटिस तयार करून घ्यावीत
- 9
त्यानंतर पॅटिस मध्यभागी कट करून घ्यावे
- 10
कट केलेले पॅटिस बेसनात घोळवून खरपूस होईपर्यंत तेलात तळावेत,... आपले पॅटिस तयार
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या