इझी स्वीट रोझ (Easy Sweet Rose Recipe In Marathi)

#choosetocook
कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने करता येणारा दिवाळीच्या फराळातील एक गोड
पदार्थ आहे
इझी स्वीट रोझ (Easy Sweet Rose Recipe In Marathi)
#choosetocook
कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने करता येणारा दिवाळीच्या फराळातील एक गोड
पदार्थ आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परातीत १ वाटी मैदा चालून घ्यावा, त्यामध्ये २-३ चमचे तूप घालून सर्व एकजीव करून घ्यावे, तूप घातल्यानंतर मैद्याचे मुटठे वळले पाहिजेत
- 2
त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे व मळलेले पीठ १५ मिनिटे बाजूला झाकून ठेवावे
- 3
तोपर्यंत एका भांड्यात २ वाट्या साखर व एक वाटी पाणी घेऊन एक तरी पाक तयार करून घ्यावा त्यामध्ये ३-४ थेम्ब लिंबाचा रस घालावा, व वेलची पूड घालून गॅस बंद करावा
- 4
१५ मिनिटानंतर मळलेल्या मैद्याचे पोळीच्या गोळ्याएवढा गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यावी त्यानंतर एका छोट्या वाटीने त्याच्या पुऱ्या काढून घ्याव्यात
- 5
चार किंवा पाच पुऱ्या फोटोत दाखविल्याप्रमाणे एकावर एक याप्रमाणे ठेवाव्यात, त्याच्या दोन्ही बाजूनं नव्या कंगव्याने प्रेस करून घ्यावे
- 6
त्यानंतर त्याची पहिल्या पुरीपासून शेवटच्या पुरीपर्यंत गुंडाळी करून घ्यावी
गुंडाळी झाल्यावर त्याला मधोमध कापून घ्यावे, कि आपले गुलाब तयार होईल, एका गुंडाळीत दोन गुलाब तयार होतात - 7
गुलाबाच्या पाकळ्या सावकाश उमलून घ्याव्या,अश्याप्रकारे सर्व गुलाब तयार करून घ्यावेत
- 8
तयार गुलाब कडकडीत तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत
- 9
तळलेले गुलाब पाकात घालावेत
- 10
कि आपले 'स्वीट रोझ' तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या