पौष्टिक मूगडाळ तडका (Moong Dal Tadka Recipe In Marathi)

गाजर घातल्यामुळे मूगडाळीची पौष्टिकता वाढते
पौष्टिक मूगडाळ तडका (Moong Dal Tadka Recipe In Marathi)
गाजर घातल्यामुळे मूगडाळीची पौष्टिकता वाढते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम २-३ तास भिजलेली एक वाटी मुगडाळ दोन वाट्या पाणी घेऊन चिमूटभर हळद व चिमूटभर मीठ टाकून चांगली शिजवून (उकडून) घ्यावी
- 2
त्यानंतर गॅस वर एक कढई ठेऊन त्यात १ चमचा तूप घालून त्यात
१ चमचा जिरेपूड, १ चमचा धने पूड, १/४ चमचा मिरी पूड,१/४ चमचा हळद, १/२ चमचा मसाला घालून घ्यावा - 3
त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालाव्यात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा
- 4
कांदा लाल झाला कि त्यामध्ये टोमॅटो घालावा व शिजू द्यावा त्यानंतर त्यात किसलेले गाजर व आले लसूण पेस्ट घालावी
- 5
हे सर्व मऊ होईपर्यंत शिजु द्यावे
- 6
टोमॅटो गाजर मऊ झाले कि त्यामध्ये शिजवून घेतलेली मूग डाळ घालावी
- 7
आपल्याला हवी तेवढी कन्सिस्टंसी ठेवावी (आवश्यक तेवढे पाणी त्यात घालावे) व ५ मिनिटे उकळू द्यावे त्यात चवी नुसार मीठ टाकावे
- 8
डाळ उकळली कि एका फोडणीपात्रामध्ये एका चमचा तूप घालून त्यामध्ये जीरे, बारीक चिरलेला लसूण व लालमिरच्या घालाव्या, हे सर्व तडतडले कि शिजत असलेल्या डाळीत हि तयार फोडणी ओतावी व झाकण लावून घ्यावे
- 9
त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा कि
आपला पॊष्टिक मूगडाळ तडका तयार.हा तडका भाताबरोबर छान लागतो.
यामध्ये गाजराप्रमाणे बिट, मुळा किसून घालू शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)
- तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (Jaad Pohyacha Chivda Recipe In Marathi)
- शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
- कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
- रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)














टिप्पण्या