कोकणातील प्रसिध्द सोलकढी (फोडणीची) (solkadhi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#रेसिपीबुक #week4
#सोलकढी कोकणातील प्रसिध्द पदार्थ. सोलकढी अनेक प्रकारे केली जाते.

कोकणातील प्रसिध्द सोलकढी (फोडणीची) (solkadhi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
#सोलकढी कोकणातील प्रसिध्द पदार्थ. सोलकढी अनेक प्रकारे केली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मिनिटे
2 ते 3 सर्व्हिं
  1. 7ते 8 आमसूले
  2. 350मिलीलिटर पाणी
  3. 1 वाटीनारळाचा चव (120 मिलीलिटर नारळाचे दूध)
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 5ते 6 लसूण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पाण्यात आमसूले भिजत घालावी. नारळाचा चव घेऊन त्यात पाणी घालून त्याचे दूध काढून घ्यावे.मिरच्या चिरून घ्याव्या. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्या.

  2. 2

    भिजलेल्या आमसूलाचे पाणी काढून घेणे. आमसूले घट्ट पिळून घ्यावे व बाजूला ठेवून द्यावे. फक्त पाणी घेणे.नारळाचे दूध आणि आमसूलाचे पाणी एकत्र करुन घ्यावे.

  3. 3

    गॅस वर पातेले ठेवून गरम करून घ्यावे व गॅस मंद करावा. त्यात तेल टाकावे. ठेचलेला लसूण,मिरची टाकून परतवून घेणे. नंतर त्यात मोहरी व हिंग घालावा. मोहरी चांगली तडतडली कि मग एकत्र केलेले मिश्रण घालून चांगले हलवून घ्यावे. गॅस बंद करावा. सोलकढी थंड करण्यासाठी ठेवावी. थंड झाल्यावर त्यात थोडी कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी. (हवी असल्यास चवीपुरता साखर घालावी.)फ्रीजमध्ये थंड करून पिल्यावर अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes