वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्ह करत आहे
  1. 250 ग्रॅमउडीद डाळ
  2. 75 ग्रॅमतूर डाळ
  3. 2टोमॅटो
  4. 2कांदे
  5. 6मिरची
  6. 1 चमचाधणे पुड
  7. 1 चमचेजीरे पूड
  8. 2 चमचेलाल मिरची
  9. 3 चमचेसांबार मसाला
  10. 1/2 चमचेहळदी
  11. 4लाल सुखी मिरची
  12. 3-4 चमचेतेल
  13. 50 ग्रॅमकोहळे
  14. 50 ग्रॅमलवकि
  15. चिंच व गूळ आवडीनुसार
  16. आवडीनुसार शेवगा शेंग
  17. 5-6कडीपत्ता

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    वडा- सर्वप्रथम उडीद डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी व पाणी घालून 5-6 तास भिजत ठेवावी. 5 तासानंतर त्यातील पाणी ड्रेन करून घ्यावे व चाळणीमध्ये डाळ काढून घ्यावी. नंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित अगदी थोडे थोडे पाणी घालून डाळ बारीक करून घ्यावी. हे मिश्रण एकदम बारीक व जाडे पण नको.

  2. 2

    मिक्सरमध्ये असलेले मिश्रण एका पातेल्यात काढावे व हे मिश्रण शक्यातो एका दिशेने हाताने 10-15 मिनिटे फेटावे. काही वेळाने मिश्रण हलके झालेले वाटेल. हाताने शक्य नसल्यास मिश्रण हॅण्ड मिक्सरणे 5 मिनिटे फेटावे.नंतर त्यात जीरे, हिरवी बारीक मिरची, कोथिंबीर व मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. वडे टाळायला घ्यायच्या आधी एका बाउल मध्ये पाणी घ्यावे. मग एक हाथ ओला करावा व त्यावर हे मिश्रण घ्यावे व त्याला वर्तुळाकार शेप देवून त्याच्या मधोमध छिद्र पाडून तेलात सोडावे. गॅस मिडयम आचेवर ठेवून वडे तळून घ्याव

  3. 3

    सांबार- सर्वप्रथम तूरीची डाळ मावुसर शिजवून व घोटून घ्यावी. फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यात जीरे, मेथीदाणे, हिंग व कडीपत्ता घालून फोडणी करावी. या फोडणीत कांदा टाकावा. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात तिखट, धणेपूड, जिरेपूड, सांबार मसाला व चाविनुसर मीठ टाकावे.

  4. 4

    त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि सर्व भाज्या मिक्स कराव्यात व मध्यम आचेवर 15 मिनिटे शिजू द्याव्यात. सर्व भाज्या शिजल्यावर घोटलेली डाळ घालावी. गरजेनुसार पाणी घालावे व नंतर त्यात भिजवलेला चिंचेचा गर आणि गूळ मिक्स करावा आणि त्याला छान उकळी येवू द्यावी. उकळी आल्यावर कोथिंबीर टाकावी व 2 मिनिटे झाकण ठेवून सांबार उकळू द्यावा. अशाप्रकारे गरमागरम सांबार वड्यासोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes