थंडगार सोलकढी (Solkadhi recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#KS1
सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो.कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.जंताची समस्या कमी करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स घटक अलर्जीचा धोका कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे.
कोकण ट्रीपमध्ये सोलकढी प्यायल्याशिवाय येणं म्हणजे कोकणात जाऊन समुद्र न बघण्यासारखं आहे!😀कोकण आणि नारळ,फणस,रातांबे,काजूगर यांचं अतूट नातं आहे.त्यातूनच मुबलक अशा नारळाच्या वैविध्यपूर्ण पाककृतींमध्ये सोलकढी म्हणूनच अग्रस्थानी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटे
5 व्यक्ती
  1. 1मोठा नारळ
  2. 1 कपकोकम आगळ
  3. 8-10आमसुले गरम पाण्यात भिजवून
  4. 4 टीस्पूनसाखर
  5. 2 टीस्पूनजीरे
  6. 2 टीस्पूनमीठ
  7. 1हिरवी मिरची
  8. 5-6लसुण पाकळ्या
  9. 2-3 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

45मिनिटे
  1. 1

    नारळ सोलून खोवून घ्यावा.जेवढा नारळाचा चव पडेल तितकेच पाणी नारळात घालावे व पहिले घट्ट दूध काढून घ्यावे.माझ्याकडे wet grinder आहे,त्यामुळे नारळ खोवणे व दूध काढणे खूप सोपे जाते.अन्यथा मिक्सरवरही करता येतेच.हा वाटलेला चव आता पंचाच्या फडक्यातून गाळून घ्यावा व घट्ट पिळून निघेल तेवढे दूध पिळून काढावे.

  2. 2

    नारळाच्या चवाचे दुसऱ्यांदा दूध काढण्यासाठी मी मिक्सरवरुन मिश्रण बारीक केले आहे.मिक्सरमध्ये आधीचा वाटलेला चव,भिजवलेली आमसुले, मिरची,लसूण, जीरे व 1-1.30ग्लास पाणी घालून वाटून घ्यावे आणि पहिल्यासारखेच हे सर्व मिश्रण पुन्हा फडक्यातून आधीच्या दुधात गाळून घ्यावे.

  3. 3

    नारळाच्या दुधास छान फिकट गुलाबी रंग येतो.तरी आंबटपणा जास्त येण्यास कोकम आगळ वापरावे.रंगही नैसर्गिकपणे वाढतो.

  4. 4

    या मिश्रणात साखर व मीठ घालून सोलकढी व्यवस्थित ढवळून घ्यावी.व थंड होण्यास जरावेळ फ्रीजमध्ये ठेवावी.मिरची लसणाचा मंद तिखटपणा आणि जीरे,आगळ,साखर मीठ यांची चव सोलकढीचा स्वाद वाढवते व क्षुधाशांती करतेच!

  5. 5

    छान अशी नारळाच्या दुधातली ही सोलकढी तयार आहे....तुमचे पित्त शमवायला,भूक भागवायला...उन्हाळ्यातील उष्णता कमी करायला!!चला तर घ्या मग...थंडगार सोलकढी.😋😋😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes