पारंपारिक शाही शीरखुर्मा (shahi shirkurma recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week7
#Themeसात्विक रेसिपी
#मिल्क शीरखुर्मा स्पेशली रमजानमध्ये सणाला आम्ही बनवतो .महिनाभर उपवास ठेवल्यानंतर शरीरातील झीज भरून येण्यासाठी शीरखुर्मा बनवतात. त्याच्या जोडीला शेवया आणि गुलगुले पण बनवतात . मी माझ्या आजी प्रमाणे शीरखुर्मा बनवते माझी आईसुद्धा आजीसारखी शीरखुर्मा बनवते. सगळे ड्रायफ्रुट्स कापताना आणि खोबऱ्याची बाहेरचं काळा आवरण काढताना पूर्ण दिवस जायचंय .खूप थकून जायचो आम्ही .पण खूप मजा यायची. आता काय ?सगळे रेडीमेड अवेलेबल असल्यामुळे आपल्याला सगळे पटकन बनवता येते. आजी शीरखुर्मा बनवताना यामध्ये काजू ,बादाम ,पिसते मनुके ,चारोळी ,खसखस ,केसर खोबरा, खजूर आणि साजूक तूप घालून बनवते. तुम्ही नक्की बनवून बघा खूप रिच फ्लेवर आणि टेस्टी लागतो हा शीरखुर्मा. आम्ही यात शेवयांचा वापर करत नाही. दिसायला जितका सुंदर दिसतो तसा खायला पण खूप अप्रतिम लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 20ग्रॅम काजू
  2. 20ग्राम बदाम
  3. 20ग्रॅम पिस्ते
  4. 20ग्राम चारोळी
  5. 20ग्रॅम किशमिश
  6. 20ग्राम किसलेला खोबर
  7. 20ग्रॅम खजूर
  8. 2टीस्पून वेलची पावडर
  9. 10ग्रॅम खसखस
  10. 6-7केसर
  11. 1लिटर दूध (फुल क्रीम)
  12. 1वाटी साखर
  13. 1टेबलस्पून तूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    शीरखुर्मा बनवण्यासाठी आपण सगळे ड्रायफूट घेऊन दोन तीन तास मिडीयम पाण्यात भिजवून ठेवून.नंतर पाण्यातून काढून छान बारीक कापून घेऊ. बाजूला ठेवून. खोबऱ्याची काळीपीठ काढून घेऊन किसून घेऊ.

  2. 2

    खजूर छान बारीक बारीक कापून घेऊ सगळे ड्रायफ्रूट छान सुकवून घेऊ. आता त्यामध्ये थोडे तूप टाकून त्यात काजू,बदाम,पिस्ते, चारोळी, मनुके,खोबरा, खजूर हलकेसे एकदम मंद आचेवर भाजून घेऊ.

  3. 3

    आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवू.एका पातेल्यामध्ये दूध घेऊ,आणि दुधाला उकळी येऊन देऊ.नंतर त्यात चिरलेला सगळे ड्रायफ्रूट टाकून छान हलवून घेऊ. मंद आचेवर सारखे सारखे हलवत राहून नंतर त्यात वेलची पावडर, तूप आणि साखर टाकून छानपैकी मिक्स करून घेऊ.

  4. 4

    दहा-पंधरा मिनिटे गॅसवर शिजवू देऊ. माझी आजी यामध्ये केशर आणि खसखस सुद्धा टाकायची त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो.आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ते टाकू शकले नाही. साखर आपल्याला गोड जितके आवडते त्या प्रमाणानुसार टाका.

  5. 5

    आता तयार आहे आपला गरमागरम आणि एनर्जीने भरपूर शीरखुर्मा. आपल्या शरीरातील झीज भरून येण्यासाठी आणि शरीराला ताकद मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes