ट्रेडिंग रेसिपी व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

विक एंडला काहीतरी खास मेनू झालाच पाहिजे. मग ठरवलं आज मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी करायची, जेणेकरून मुलांच्या पोटात सगळया भाज्या पण जातील. रेस्टॉरंट सारखीच फक्कड आणि झणझणीत व्हेज कोल्हापुरी तुम्ही पण नक्की करून बघा.....

ट्रेडिंग रेसिपी व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)

विक एंडला काहीतरी खास मेनू झालाच पाहिजे. मग ठरवलं आज मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी करायची, जेणेकरून मुलांच्या पोटात सगळया भाज्या पण जातील. रेस्टॉरंट सारखीच फक्कड आणि झणझणीत व्हेज कोल्हापुरी तुम्ही पण नक्की करून बघा.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटे
४ जणांना
  1. गाजर, फरसबी, मटार,
  2. फ्लॉवर, सिमला मिरची, पनीर
  3. 2कांदे चिरून व २ टोमॅटो चिरलेले
  4. 5-6काजू
  5. 4-5लसूण पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा
  6. चवीनुसारमीठ
  7. खडा मसाला - तेजपत्ता, दालचिनी, वेलदोोडा, मसाला वेलची, लवंगा, दगडफूल, जीरे
  8. 1 चमचाकिचनकींग मसाला, गरम मसाला, हळद, तिखट, कसूरी मेथी, कांदा लसूण मसाला
  9. 2 चमचेदही
  10. तेल

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    प्रथम सगळया भाज्या चिरून घ्याव्या.

  2. 2

    नंतर थोडया तेलावर खडा मसाला, कांदा, टोमॅटो, आले, लसूण व काजू सगळे परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सर मधून दही टाकून ग्रेव्ही बारीक करून घ्यावी. यामध्ये वाटताना किचनकींग मसाला, गरम मसाला, हळद व लाल तिखट घालून ग्रेव्ही बनवून घ्यावी.

  3. 3

    चिरलेली भाजी तेलावर परतून घ्यावी. फार मऊ होइल इतकी परतू नये, क्रंची राहील अशीच परतावी, नंतर कढईत तेल घालून जीरे फोडणी करावी, यामध्ये मिक्सरवर बारीक केलेले वाटण घालून तेल साइडनी सुटेपर्यंत परतावे, नंतर त्यात क्रंची परतून घेतलेली भाजी व पनीर घालून त्यातच चवीनुसार मीठ टाकावे, त्यानंतर कसूरी मेथी हातावर क्रश करून भाजीत घालावी आणि झाकण ठेवून ५ मिनीटे शिजवावी.

  4. 4

    तयार आहे फक्कड झणझणीत व्हेज कोल्हापुरी सर्व्ह करण्यासाठी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes